एबीआयटीमध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या रिक्त जागी प्रवेश प्रक्रिया

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑक्टोबर २०२१ | सातारा | विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभयसिंहराजे भोसले इन्स्टिट्यूट  ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) शाहूनगर-शेंद्रे, सातारा येथे डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या २०२१-२२ या वर्षातील रिक्त जागांसाठी सुरु असलेली प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्यात आलेली आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी दिली.
एबीआयटी पॉलिटेक्निकला ए.आय.सी.टी.ई. नवी दिल्ली, महाराष्ट्र शासनाची मान्यता असून एम.एस.बी.टी.ई. संलग्नता प्राप्त आहे सध्या तंत्रनिकेतनमध्ये डिप्लोमा कॉम्प्युटर डॉज माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि., मेकॅनिकल इंजि हे कोर्सेस उपलब्ध आहेत. या तंत्रनिकेतनने एक मॉडेल पॉलिटेक्निक म्हणून नाव कमविले असून भव्य व सुसज्ज इमारत, अद्यावत लॅब, भव्य वर्कशॉप, भव्य क्रीडांगण, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग व दरवर्षी लागणारा तंत्रनिकेतनचा निकाल या निश्चितच तंत्रनिकेतनच्या जमेच्या बाजू आहेत. नॅशनल हायवे लगत व हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले हे पॉलिटेक्निक विद्यार्थी व पालकांचा प्रतिसादामुळे सातारा जिल्हयातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ओळखले जाते. मुलींच्या राहण्याची केलेली उत्कृष्ठ सोय व त्यावर असलेले संस्थेचे नियंत्रण त्याचप्रमाणे मुलांना मोफत शिक्षणाची संधी, कराड, उंब्रज, सातारा ठिकाणाहून संस्थेने मुला मुलीना येणे-जाणेसाठी बस सेवा कार्यरत आहे.
सर्व सोयी सुविधांचा विचार करून प्रवेश घेताना पालकसुद्धा या तंत्रनिकेतनचा प्राधान्याने विचार करतात. येथे येणारा प्रत्येक विद्यार्थी १०० टक्के यशाची खात्री बाळगू शकतो कारण अद्यावत कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यास सदैव कटिबध्द तसेच विद्यार्थ्याचे उज्जवल भविष्य घढविण्यास संस्था बांधील आहे. प्रथव वर्ष व थेट द्वितीय वर्षामध्ये रिक्त जागेवर प्रवेश घेणा-या इच्छुक विद्यार्थ्यांनी अंतिम दि २० / १० / २०२९ च्या अगोदर तंत्रनिकेतनमध्ये येऊन संपर्क साधावा, असे आवाहन तंत्रनिकेतनचे प्राचार्य एस. यु.  धुमाळ यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!