दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२२ । सातारा । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मुलींचे शासकीय वसतिगृह वाई येथे सन 2022-23 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. इयत्ता 8 वी ते पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सातारा जिल्ह्यातील अन. जाती, अनु. जमाती, अनाथ व दिव्यांग या संवर्गातील मुलींनी शासकीय वसतिगृह वाई येथे त्वरीत संपर्क साधावा असे, गृहपाल शासकीय वसतिगृह वाई यांनी कळविले आहे.