राजे ग्रुपचे कौतुकास्पद कार्य-ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी दिला गरीब विद्यार्थीनीला मोबाईल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, निढळ, दि. ०२ : राजे ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी – हनुमान विद्यालय निढळ येथे इयत्ता दहावी मध्ये असलेली गरीब कुटुंबातील मुलगी कु.आरती दादासाे खांडे या विद्यार्थींनीला ऑनलाइन शिक्षण घेता याव म्हणुन दिला माेबाईल भेट.

राजे ग्रुप हा सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असताे. हा ग्रुर खरतर आमचे मित्र कै.संताेेषभाऊ भाेसले यांच्या संकल्पनेतुन तरुणांनी एकत्र येवुन स्थापित केला.ग्रुपच्या माध्यातुन शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते.त्यापलीकडे जावुन आपण छत्रपतींचे मावळे आहाेत तर समाजाप्रती आपण काही तरी देणं लागताे या उद्देशाने ग्रुपमधील सर्व सदस्य याेगदान देत असतात. या ग्रुपमधील बरेच जण देशाच्या सेवेसाठी विविध संरक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत पण असे काही सामाजिक कार्य करण्याचे ठरले की सर्वजण सढळ हाताने मदत करीत असतात.

सध्या काेराेनाच्या प्रादुर्भाव असल्यामुळे शाळा पुर्णपणे बंद अाहेत.सामान्य कुटुंबातील मुलांना माेबाईलवर अभ्यास करणे शक्य नाही. किंंवा पालकांची आर्थिक परिस्थिती नाही त्यामुळे त्या मुलांना इच्छा असुन सुद्धा शिक्षण घेता येत नाही. अशा परस्थितीत काही दिवसांपुर्वी हनुमान विद्यालय निढळचे प्रभारी मुख्याद्यापक श्री. कांबळे सर यांच्याकडुन माहीती मिळाली,त्यांनी सुचना केली की आपल्या निढळ गावातील मुलगी कु. आरती दादासाे खांडे वडील हयात नाहीत.घरची परिस्थिती बेताची,अभ्यासात खुप हुशार व कर्तुत्ववान आहे अशी माहीती कांबळे सरांनी दिली. की लगेच राजे ग्रुपचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सदस्य यांना संंपर्क केला. की आपल्या ग्रुपच्या माध्यमातुन एक चांगला माेबाईल त्या विद्यार्थीनींसाठी उपलब्ध करुन देता येईल का सर्वांनी आनंदाने हाेकार दिला आणि आज त्याची पुर्तता करण्यात आली.

त्या सामान्य कुटुंबातील वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलीला ही मदत नसुन आमची जबाबदारी,सामाजिक बांधिलकी म्हणुन हे कार्य करीत आहाेत.ग्रुपचे अध्यक्ष प्रल्हाद पवार ( बाळु ) उपाध्यक्ष – कैलास भाेसले सचिव – अविनाश भाेसले, गणेश खुस्पे, सागर भाेसले, आेंकार भाेसले, शाळेचे प्रभारी मुख्याद्यापक कांबळे सर यांच्या वतीने आरती खांडे हीला माेबाईल देण्यात आला. दहावीमध्ये तिनेे आणखी चांगला अभ्यास करुन चांगले यश संपादन करावे.तिच्या पुढील शैक्षणिक खर्च देखील ग्रुपच्या माध्यमातुन केला जाईल.तिच्या शैक्षणिक वाटचालीसाठी राजे ग्रुप तिच्या साेबत असेल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!