दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२३ | बारामती |
महाराष्ट्र राज्य युवक संचालनालय, पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बारामती तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षे वयोगटाखालील ३५ किलो वजन गटामध्ये कुस्ती स्पर्धेत ज्ञानसागर गुरूकुल इंग्लिश मीडियम स्कूलमधील आदित्य सचिन सावंत या विद्यार्थ्याने पाचही फेरीमध्ये चुरशीच्या लढतीत विजय मिळवत उल्लेखनीय यश मिळवून तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. या यशामुळे त्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आकाशात भरारी घेताना पक्ष्याला पंख असावे लागतात. विद्यार्थ्यांनासुद्धा उंच भरारी घेण्यासाठी चांगले शिक्षकरूपी पंखच असावे लागतात. त्याशिवाय कोणताही विद्यार्थी उत्तुंग भरारी घेऊ शकत नाही. कुस्ती प्रशिक्षक वस्ताद हनुमंत पवार व ज्ञानसागर गुरूकुलचेे क्रीडा शिक्षक प्रतिभा चौधरी मिस यांचे मार्गदर्शन लाभले.
ज्ञानसागर गुरूकुल संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, विश्वस्त पल्लवी सांगळे, दिपक सांगळे, दीपक बिबे, सीईओ संपत जायपत्रे, विभागप्रमुख गोरख वनवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, निलिमा देवकाते, राधा नाळे, निलम मिस व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग यांनी विशेष अभिनंदन व कौतुक केले.