अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते याच्यावर गुन्हा दाखल


 

स्थैर्य, सातारा, दि.९: खाजगी वृत्त वाहिनीवरील कार्यक्रमात छत्रपती शिवरायांचे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद तारळे, ता. पाटण येथील राजेंद्र बापुराव निकम यांनी दिली आहे.

या फिर्यादीत म्हटले आहे की, राजेंद्र निकम हे स्वराज्य सेना (महाराष्ट्र) या पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणुन काम करतात. सकल मराठा समाज्याच्या वतीने मराठा समाज्याला आरक्षण मिळावे, याकरिता मराठा समाजाने चार वर्षांपासून जनआंदोलन उभे केलेले आहे. मराठा समाज्याच्या समन्वय समितीच्या वेगवेगळ्या ठिकाणी नियमीतपणे आरक्षण व इतर मागण्याचे अनुषंगाने नियमती बैठका होत असतात. त्या अनुषंगाने दि. 7 रोजी सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षण व इतर मराठा समाज्याच्या मागण्याचे अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आलेली होती. बैठकीसाठी राज्यभरातून आलेले सदस्य उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज संभाजी मराहाज होते. बैठक झाल्यानंतर 7.30 वाजण्याच्या सुमारास मुंबई येथील एका न्युज चॅनेलवर आरक्षण संदर्भात कार्यक्रम सुरू होता. त्याचे थेट प्रक्षेपण सुरू असताना अ‍ॅड. गुणरत्न सदावते यांनी चॅनेलवर छत्रपती शिवाजी महाराजांचे वशंज खा. उदयनराजे भोसले व खा. छत्रपती संभाजी महाराज यांचेविषयी अत्यंत खालच्या पातळीवर येवून टिका केली व मी छत्रपतींच्या गाद्यांना मानत नाही, असे बोलून मराठा समाजाचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचा एकेरी उल्लेख करून सकल मराठा समाजाचा अपमान होईल असे शब्द वापरले आहेत.

जातीपातींमध्ये तेढ निर्माण होईल व दंगली भडकतील व सार्वजनिक शांततेचा भंग होईल असे शब्दोच्चार करून भावना भडकवण्याचे काम अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे, असेही राजेंद्र निकम यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!