दैनिक स्थैर्य । दि. २० डिसेंबर २०२२ । सातारा । शाहूनगर ते मोनार्क हॉटेल एसटी कॉलनी ते युनायटेड वेस्टर्न बँक कॉलनी या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र ते निकृष्ट दर्जाचे असल्याने पहिल्या पावसातच रस्त्याला चरे पडून खड्डे पडले या रस्त्याला पुन्हा एकदा डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी शाहूनगर चे रहिवासी वकील सचिन तिरोडकर यांनी केली आहे
या संदर्भातील निवेदन त्यांनी अभिजीत बापट यांना सादर केले. या रस्त्याची दुरुस्ती आठ दिवसाच्या आत न झाल्यास नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर तीस डिसेंबर रोजी उपोषण करण्यात येइल याची नोंद घ्यावी असा इशारा त्यांनी दिला आहे.
पत्रकात नमूद आहे की शाहूनगर परिसरात जाण्यासाठी मोनार्क हॉटेल ते एसटी कॉलनी ते युनायटेड वेस्टर्न कॉलनी यादरम्यानच्या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात आले होते . मात्र पहिल्याच पावसामध्ये या रस्त्यावर खड्डे पडले व रस्त्याची दुरावस्था झाली आहे . सदर रस्त्याचे काम ठेकेदारामुळे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहेत याबाबत नागरिकांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी आहे या रस्त्यावर उभ्यासरी पडल्या असून हा रस्ता रहदारीचा असतानाही धोकादायक बनला आहे . काही ठिकाणी रस्त्याचा समतोलपणा हरवलेला आहे रस्त्याची खडी उखडलेली असून नागरिकांना प्रचंड धुळीच्या लोटातून मार्ग काढावा लागत आहे परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका असून संबंधित ठेकेदार आणि सातारा नगरपालिका या प्रकाराला जबाबदार असल्याचा आरोप तिरोडकर यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
यासंदर्भात निवेदन यापूर्वीही दीड महिन्यापूर्वी देण्यात आले होते मात्र अद्यापही याची कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही जर मोनार्क हॉटेल ते युनायटेड वेस्टर्न कॉलनी या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही तर लाक्षणिक उपोषणाचा इशारा देत तिरोडकर यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.