अभिनेत्री तापसी पन्नूचा खुलासा – पॅरिसमध्ये माझा बंगला नाही आणि पाच कोटींची रोखही घेतली नाही; बॉयफ्रेंडने क्रीडा मंत्र्यांकडे मागितली मदत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,मुंबई, दि. ६: फॅंटम फिल्म्सच्या अनेक शेअर होल्डर्सच्या घरावर आयकर विभागाचे छापे पडले असून सलग चौथ्या दिवशी कारवाई सुरु आहे. क्वान टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करणा-या लोकांचीही आज चौकशी होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फँटम फिल्म्सचे होल्डर्स अनुराग कश्यप, क्वान आणि फँटम फिल्म्सचे भागीदार मधु मंटेना आणि दिग्दर्शक विकास बहल यांच्या खाती त्या बँकांमध्ये तेथे आज आयकर विभागाचे पथक चौकशीसाठी जाणार आहे. या कारवाईबद्दल अभिनेत्री तापसी पन्नूची प्रतिक्रिया पहिल्यांदाच समोर आली आहे.

तापसी पन्नूने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर झालेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या पोस्टमध्ये तापसीने म्हटले, – ‘तीन दिवसांच्या सखोल चौकशीतून तीन मुख्य गोष्टी समोर आल्या आहेत. एक म्हणजे पॅरीसमधील ज्या कथित बंगल्याची चावी माझ्याजवळ असल्याचा दावा केला जातोय, ज्याची मी मालकीण आहे, असे सांगितले जात आहे, तिथे मी कधीच उन्हाळ्याच्या सुट्टीवर गेलेले नाही,’ असे तापसीने म्हटले आहे.

पाच कोटींची पावती मिळाल्याच्या आरोपावर तापसीने आपल्या दुसर्‍या पोस्टमध्ये म्हटले, “पाच कोटींची कोणतीही पावती तिच्याजवळ नसून तिने कुणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत.” शेवटी तिसर्‍या पोस्टमध्ये तिने खुलासा केला की, 2013 च्या कोणत्याही छाप्याशी तिचा संबंध नाही. तिने लिहिले, ‘अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार 2013 मध्ये माझ्या घरावर छापा पडला होता. ही ‘स्वस्त कॉपी’ नाही,’ असे तापसी म्हणाली आहे. कंगनाने अनेकदा तापसीचा उल्लेख ‘स्वस्त कॉपी’ म्हणून केला आहे, त्यावर तापसीने उपरोधिक टोला लगावला आहे.

तापसीच्या बॉयफ्रेंडने क्रीडामंत्र्यांकडे मागितली मदत
या संपूर्ण प्रकरणावर काही भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देणारा तापसी पन्नूचा बॉयफ्रेंड मॅथियस बोई याने केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट केले असून घरामध्ये उगाच तणाव निर्माण झाले असल्याचे म्हटले आहे. त्याच्या या ट्विटला किरेन रिजिज यांनी उत्तर दिले असून आपल्या कर्तव्यासोबत एकनिष्ठ राहण्याचा सल्ला दिला आहे.

मॅथियस बोई याने किरेन रिजिजू यांना ट्विट करत म्हटले आहे की, “मी थोडा गोंधळलो आहेत. पहिल्यांदाच काही महत्वाच्या खेळाडूंचा प्रशिक्षक म्हणून भारताचे नेतृत्व करत आहे. यादरम्यान तापसीच्या घरावर आयकराने धाड टाकत आहे, यामुळे कुटुंबाला आणि खासकरुन तिच्या आई-वडिलांना विनाकारण त्रास होत आहे. किरेन रिजिजू कृपया काहीतरी करा”.

मॅथियसच्या या ट्विटला किरेन रिजिजू यांनी उत्तर दिले असून म्हटले आहे की, “कायदा सर्वोच्च असून, त्याच्याशी बांधील राहिले पाहिजे. हा विषय आपल्या हातात नाही. पण आपल्या व्यवसायिक कर्तव्याशी बांधील राहिले पाहिजे आणि भारतीय खेळासाठी जे सर्वोत्तम आहे ते केले पाहिजे”.

आयकर छाप्यात 4 मोठे खुलासे, CBDT ने कोणत्याही व्यक्तीचे किंवा कंपनीचे नाव घेतले नाही
आयकर विभागाने दोन चित्रपट कंपन्या, दोन गुणवत्ता व्यवस्थापन कंपन्या आणि आघाडीच्या अभिनेत्रीच्या निवासस्थानावर छापे टाकून 650 कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता उघडकीस आणली असल्याचा दावा गुरुवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने केला. मात्र मंडळाकडून कोणाचंही नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

  • सीबीडीटीच्या मते, चौकशीत आघाडीच्या प्रॉडक्शन हाऊसने बॉक्स ऑफिसच्या वास्तविक उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न दर्शवले आहे. सुमारे 300 कोटींची ही तफावत आहे. प्रॉडक्शन हाऊस त्याचा हिशेब देऊ शकले नाही.
  • एका प्रॉडक्शन हाऊसने शेअर्सच्या व्यवहारात अंडर व्हॅल्युएशन केले आहे. हे संपूर्ण प्रकरण सुमारे 350 कोटींच्या कर चोरीचे आहे. याचा पुढील तपास केला जात आहे.
  • एका अभिनेत्रीच्या घरावर छापेमारीदरम्यान 5 कोटींच्या रोख व्यवहाराच्या पावती मिळाल्या आहेत. याची पडताळणी केली जात आहे.
  • आघाडीच्या निर्माता-दिग्दर्शकाच्या ठिकाणांवर छापे टाकताना बनावट खर्चाचे पुरावे सापडले. यावेळी 20 कोटींचा कर चुकवल्याचे चौकशीत समोर आले आहे. अभिनेत्रीविरोधातही असेच पुरावे सापडले आहेत, ज्याचा तपास सुरू आहे.

Back to top button
Don`t copy text!