अभिनेत्री मिष्टी मुखर्जी हिचं वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी निधन


 

स्थैर्य, मुंबई, दि.४: बंगाली आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मिष्टी मुखर्जी शुक्रवारी बंगरूळ इथं निधन झालं. मिष्ठीनं अवघ्या २७ व्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतला.

मिष्टी काही महिन्यांपासून मूत्रपिंडच्या आजावर उपचार घेत होती. आजारी होती. अखेर शुक्रवारी मूत्रपिंड निकामी झाल्यानं तिचं निधन झालं. शनिवारी तिच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले.

२०१३ साली मिष्टीनं ‘मैं कृष्णा हूं’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिनं दिग्दर्शक राकेश मेहता यांचा चित्रपट ‘लाइफ की तो लग गई’मध्येही काम केलं होतं. चित्रपटांशिवाय मिष्टीचे बोल्ड म्युझिक अल्बम आणि आयटम नंबर प्रसिद्ध होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!