स्थैर्य, दि.२१: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत अचानक बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी मिथुन चक्रवर्ती ‘द
कश्मीर फाइल्स’ या आपल्या वेबसीरीजच्या चित्रीकरणाकरिता मसुरी येथे गेले
होते. पण, चित्रीकरण सुरू असताना त्यांना उभे राहण्यास अचानक त्रास होऊ
लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. अन्नातून विषबाधा
झाल्याने त्यांची तब्येत बिघडल्याचं सांगण्यात येत आहे.
शनिवारी
देखील या वेबसिरीजच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेते मिथुन चक्रवर्ती सेटवर
पडले होते. यामुळे चित्रीकरण थांबवावे लागले होते.
मात्र, यावेळी विषबाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
यापूर्वी
अभिनेते मिथुन मोठ्या पडद्यावर 2019 साली विवेक अग्निहोत्री यांच्या
‘ताश्कंद फाईल’ या चित्रपटात दिसेल होते. हा चित्रपट लाल बहादूर शास्त्री
यांच्या जीवनावर आधारित आहे. आता ते त्यांच्याच दिग्दर्शनाखाली तयार होत
असलेल्या द कश्मीर फाईल्स या वेबसीरीजच्या चित्रीकरणासाठी मसूरीत दाखल झाले
होते.