स्थैर्य, सातारा, दि.१९: मोटार सायकल चोरी व दरोडा, अपहरण अशा गंभीर गुन्ह्यात हवे असलेले तीन सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोवई नाका, वडूज आणि पाचवड परिसरात सापळा, रचून जेरबंद केले.
याबाबत माहिती अशी, दि. 19 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक आनंदसिंग साबळे हे पोलीस पथकासह सातारा शहर परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अपहरणाच्या गुन्हयातील सन 2016 पासुन फरारी असलेला आरोपी पोवई नाका परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेच त्याठिकाणी पोलिस पथकाने सापळाव लावून संशयितास जेरबंद केले.
तत्पूर्वी, दि. 18 रोजी फरारी आरोपी पकडण्याच्या मोहीमेच्या अनुषंगाने एक पथक वडुज पोलीस ठाणे हद्दीत रवाना करण्यात आले होते. या पथकाने वडुज पोलीस ठाण्यात 2013 पासुन दरोडयाच्या गुन्हयातील फरारी आरोपी यास सापळा लावुन पकडले. तसेच दिनांक 16 रोजी सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मोटर सायकल चोरीतील आरोपी पाचवड परिसरात येणार असल्याचे कळताच त्यासही सापळा लावून मोटर सायकलसह पकडण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
या तिन्ही संशयितांना तपासकामी सातारा शहर पोलीस ठाणे, सातारा तालुका पोलीस ठाणे व वडुज पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आनंदसिंग साबळे, ज्योतीराम बर्गे, हवालदार अतिष घाडगे, संतोष पवार, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, नितिन गोगावले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, निलेश काटकर, मुनिर मुल्ला, अमित सपकाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, संकेत निकम यांनी केली.
आरोपिंची नावे:
प्रशांत सुनिल बिसुरे वय २ ९ वर्षे रा.खावली ता.जि.सातारा . ( पाहीजे असलेला आरोपी ) २ ) राजकुमार नारायण नाईक वय ३५ वर्षे रा.उंब्रज ता.कराड जि.सातारा . ( पाहीजे असलेला आरोपी ) ३ ) जीवन साहेबराव पवार वय २ ९ वर्षे रा.सानपाने ता.जावळी जि.सातारा . ( मोटर सायकल चोरी )