जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांची कारवाई  प्रतिनिधी – नागठाणे


स्थैर्य, सातारा, दि.०७: सातारा तालुक्यातील माजगाव व नागठाणे येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तिघांजणावर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत माजगाव फाट्यावरील चहा व साई स्नॅक सेंटर व नागठाणे येथील दोन चहाच्या टपरी दुकान सुरू ठेवल्याने हि कारवाई करण्यात आली आहे. या घटनेत संशयित शुभम बापुराव घोरपडे (वय.२४ रा.निसराळे ता.सातारा), बाबासो जगन्नाथ कांबळे (वय५२) व सुनील दत्तु धनवडे (दोघेही रा.नागठाणे ता.सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नावे आहेत. हि कारवाई बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डाॅ. सागर वाघ, पोलिस विजय साळुंखे, उत्तम गायकवाड, कपिल टिकोळे यांनी केली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र फरांदे, पोलिस हवालदार बाबा महाडिक, राकेश देवकर करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!