स्थैर्य, सातारा, दि. ३०: पाटखळ, ता. साताराच्या हद्दीतील शिदोरी हा ॅटेलसमोर ट्रक अडवून चालक आणि क्लिनरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून पाच हजार जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अज्ञात सहाजणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोनजणांना जेरबंद केले आहे.
याबाबत माहिती अशी, दि. 24 डिसेंबर रोजी रात्री 11.30च्या सुमारास ज्ञानेश्वर रामदास आंबेकर रा. घोटी, ता. ईगतपुरी, जि. नाशिक हे ट्रक (एम. एच. 15 डी. के./5081) घेवून कोल्हापूरहून नाशिककडे जात होते. पाटखळ गावच्या हद्दीतील शिदोरी धाब्याजवळ या ट्रकला सहाजणांनी कार आडवी मारून अडवले. यानंतर फिर्यादी यांना वाढेफाटा येथे माझी गाडी का ठोकली? असे म्हणून फिर्यादी व क्लीनर यांना हाताने लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन ट्रकमधील 5 हजार रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेले. याप्रकरणी अनोळखी 6 इसमांविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाणे येथे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सुचना वरिष्ठ अधिकार्यांनी दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने संशयितांची माहिती काढण्यास सुरुवात केली. यावेळी संशयित रेका ॅर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्यांचा ठावठिकाणा शोधून अटक करण्याचे मोठे आव्हान पोलीस पथकासमोर होते. दरम्यान एलसीबीचे पोनि किशोर धुमाळ यांना आरोपींपैकी दोनजण दहीवडी बसस्थानक परिसरात आल्याची माहिती प्राप्त झाली. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व तपास पथकास दहीवडी येथे जावून आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे तपास पथकाने दहीवडी बसस्थानक परिसरामध्ये सापळा लावून दोन्ही संशयित आरोपींना दि. 29 रोजी पहाटे 03.30च्या सुमारास शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे सांगितले आहे. आरोपींना पुढील कारवाईकामी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनाप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहायक फौजदार उत्तम दबडे, जोतिराम बर्गे पो हवा. अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पो. ना. शरद बेबले, प्रविण फडतरे, साबीर मुल्ला, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, विशाल पवार, रो हित निकम, सचिन ससाणे, नितीन गोगावले, प्रमोद सावंत, गणेश कापरे, अमित सपकाळ, विक्रम पिसाळ, वैभव सावंत यांनी कारवाई केली.