
दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२२ । सातारा । खिलारी गाईंच्या हत्या हे देशी पशुधन वाचवण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला पाहिजे मात्र फलटण तालुक्यातील बारामती रस्त्यावरील आणि सोमवार पेठेतील बेकायदेशीर रित्या सुरू असलेले कत्तलखाने पोलिसांनी कारवाई करून कायमस्वरूपी बंद करावेत अन्यथा वारकरी संप्रदाय अखिल भारत कृषी गोसेवा संघ आणि श्री शिवप्रतिष्ठान यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये जनजागृती अभियान सुरू करण्यात येईल असा इशारा गोसेवा संघ पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मिलिंद गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
यावेळी यावेळी प्रतापगड उत्सव समितीचे संजीव शहा संजय भोसले आबासाहेब साप्ते इत्यादी उपस्थित होते. एकबोटे पुढे म्हणाले दरवर्षी भारतामध्ये पाच कोटी खिलारी गायांची कत्तल केली जाते हे गोमांस चोरट्या पद्धतीने चीनला विकले जाते त्यामधून काही औषधी तत्व तसेच हे मांस आखाती देशांना विकण्याचा एक मोठे रॅकेट आहे त्यामुळे हे असे कत्तलखाने कधीही बंद होत नाहीत फलटण तालुक्यातील बारामती रस्त्यावर तसेच शहरातील सोमवार पेठेमध्ये असणारे बेकायदेशीर कत्तलखाने हा खरा अडचणीचा विषय आहे बारामती रस्त्यावरील कत्तलखान्यामुळे सोमंथळी आणि सांगवी गावातील पिण्याचे पाणी दूषित झाले आहे लोकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे . सोमवार पेठेमध्ये अजीम कुरेशी वाहिद कुरेशी आणि मुबारक कुरेशी या कसायांच्या बेकायदेशीर शेडवर वारंवार कारवाई होऊन सुद्धा ते पुन्हा उभे केले जातात म्हणजेच यामागे कोणता तरी मोठा राजकीय वरदहस्त आहे .या बेकायदेशीर गोमांस निर्यातीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा पैसा हा आखातात दिला जातो आणि तोच पैसा एका मशिदीच्या बँक अकाउंट वर जमा होऊन ती रक्कम भारतात अतिरेकी संघटनांना पुरवली जाते यासंदर्भात विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची उच्च स्तरीय चौकशी सुद्धा झाली होती अशी माहिती मिलिंद एकबोटे यांनी सांगितले फलटण तालुक्यात हिंदू धर्माच्या श्रद्धेची अवहेलना केली जात आहे फलटण ही नगरी ऐतिहासिक नगरी असून येथे रामाचे प्रसिद्ध मंदिर असून जैन धर्मियांचे सुद्धा पवित्र तीर्थस्थळ आहे स्वतः रामराजे हे एक प्रगल्भ राजकीय व्यक्तिमत्व असून त्यांच्या नावातही राम आहे असे असताना राजकीय वर्धा मुळे सर्रासपणे बेकायदेशीर कत्तलखाने सुरू राहावेत हे फलटणच्या परंपरेला शोभणारे नाही त्यामुळे अशी जी कसाई राजकीय वरदहस्ताने पोहोचलेले आहेत यांची ईडीमार्फत चौकशी केली जावी अशी मागणी मिलिंद एकबोटे यांनी केली सोमवार पेठ आणि बारामती रस्त्यावरील कत्तलखान्यांवर कारवाई न झाल्यास वारकरी संप्रदाय अखिल भारत कृषी गोसेवा संघर्ष प्रतिष्ठान या संघटना फलटणमध्ये तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा त्यांनी दिला आहे सातारा जिल्ह्यात 1996 सालापासून प्रतापगड उत्सव समिती शिवप्रताप दिन साजरा करत आहे गेल्या तीन वर्षापासून प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा झालेला नाही जर शासनाला या उत्सवाची आठवण येत नसेल किंवा त्यांना जमत नसेल तर हा उत्सव प्रतापगड उत्सव समितीला शिवप्रताप दिन साजरा करण्यासाठी दिला जावा आणि सरकारने त्याची परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी मिलिंद एकबोटे यांनी केली.