स्थैर्य, फलटण : साखरवाडी ता. फलटण येथे मास्क न वापरता फिरणार्या विरुद्ध कारवाईचा बडगा उगारत प्रशासनाने 4 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी सर्वत्र मास्क, सॅनिटायझर वापर, गर्दी टाळणे, हात धुणे बंधनकारक करण्यात आले असून मास्क वापरण्यामुळे करोना नियंत्रणात रहात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जर्मनीने जीवनावश्यक वस्तू खरेदी व सार्वजनिक वाहतुकी दरम्यान मास्कचा वापर अनिवार्य केला आहे, भारतातही करोना हॉट स्पॉट बनलेल्या मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून साखरवाडी येथे मास्क वापरण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. गुरुवार दि. 9 जुलै रोजी फलटण पूर्व भागात मास्कचा वापर न करणार्या लोकांवर धडक कार्यवाही करत सुमारे 7500 हजार रूपये दंड वसूल केला. अशी माहिती फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ. अमिता गावडे यांनी दिली.
फलटण तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढत असताना प्रशासन खडबडून जागे झाले असून या पार्श्वभूमीवर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन भरारी पथकाने फलटण तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढत असताना फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सावंत,साखरवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागटीळक यांच्यासह अन्य पोलीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या भरारी पथकाने आज सकाळपासून फलटण पूर्व भागातील राजाळे, पिंप्रद, मिरढे, नाईकबोमवाडी येथे मास्कचा वापर न करणार्या लोकांवर धडक कारवाई करत सुमारे 7500 हजार रूपये दंड वसूल केला. सोबत ग्रामपंचायत कर्मचारी दत्तात्रय जगताप, राजन कांबळे यांनी सहकार्य केले.
फलटण शहरातही फलटण नगरपालिकेकडून विना मास्क फिरणार्यांवर कारवाई सुरु करण्यात आली असून शहरातील प्रमुख चौकांमधून पालिकेच्या कर्मचार्यांकडून ही कारवाई करण्यात येत आहे.