जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई


स्थैर्य, सातारा, दि.०४: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शहर व तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. वाढे गावच्या हद्दीतील सातारा कंदी पेढे दुकानाजवळ आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलेश बबन नलावडे (वय 30, रा. वाढेफाटा) याच्यावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार दिपक पोळ यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हवालदार तोरडमल तपास करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून सातारा चिकन सेंटर सूरू ठेवल्याप्रकरणी इर्शाद चांदगणी आतार (रा. बसाप्पा पेठ) याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत हवालदार राहूल खाडे यांनी फिर्याद दिली आहे. हवालदार कारळे तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!