दैनिक स्थैर्य | दि. १३ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
ऐन दिवाळीच्या सणामध्ये कोणतीही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून, हिंदू व हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात फटाका स्टॉलला परवानगी देताना फलटण ग्रामीण पोलिसांनी फटाके विक्रेत्यांना देव-देवतांचे फोटो असलेले फटाके विकत आणू नका व त्यांची विक्री करू नका, असे नोटीस दिलेले होते. तरी त्याचा भंग करून बरड या ठिकाणी काही स्टॉल विक्रेत्यांनी महालक्ष्मीचे फोटो असलेले फटाके विक्रीसाठी ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ डब्ल्यू १३१ प्रमाणे खटला दाखल केलेला आहे.
कारवाई करण्यात आलेल्या विक्रेत्यांची नावे अशी : सतीश एकनाथ टेम्बरे (रा. बरड, मिळाला माल ५ पुडे लक्ष्मी फटाका), प्रशांत कृष्णा वेदपाठक (राहणार राजाळे).
दरम्यान, काही लोक कार्यकर्त्यांच्या नावाखाली पोलिसांना न कळवता दुकानातून देव-देवतांचे फटाके घेऊन जात आहेत. असा प्रकार निदर्शनास आल्यास फटाके चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. अशी गोष्ट निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवावे, परस्पर कारवाई करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.