दैनिक स्थैर्य | दि. २६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
राजाळे (ता. फलटण) गावच्या हद्दीत एसटी स्टॅण्डच्या आडोशाला मंगळवारी देशी दारूची बेकायदेशीरपणे विक्री करताना एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सूर्यकांत मुगुटराव निंबाळकर (वय ५८, रा. राजाळे, ता. फलटण) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी देशी दारूच्या बाटल्यांसह एकूण ९८० रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.