स्थैर्य, सातारा, दि. २६: जिल्हाधिकार्यांनी कोवीड-19 च्या अनुषंगाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाढे, ता. सातारा येथील एका हॉटेल चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत कुंडलिक फाळके वय 38 वर्ष रा. खेड, असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, कोवीड-19 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी आदेश जारी केले आहेत. तरीही श्रीकांत फाळके याने वाढे फाटा येथील हॉटेल देहाती रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले होते. याबाबत हवालदार मुलाणी यांनी फाळके याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार तोरडमल करत आहेत.