जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग करणार्‍या चौघा दुकानदारांवर कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 2 : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व दुकाने व मार्केटस्ना सकाळी 9 ते 7 पर्यंत वेळ दिली आहे. मात्र, हा आदेश डावलून सकाळी साडेआठ वाजता दुकाने सुरू ठेवणार्‍या चार दुकानांवर शाहूपुरी पोलिसांनी आज कारवाई केली.

याबाबत माहिती अशी, दि. 1 रोजी सकाळी बकरी ईद व लॉकडाऊनच्या अनुषंगाने शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि वायकर व पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. यावेळी सकाळी 08.20 वाजता सातार्‍यातील मोती चौकात लाटकर स्वीट मार्टचे मालक अजय मोहनराव लाटकर वय 55, रा. 112 शुक्रवार पेठ सातारा, शेजारील दुसरे लाटकर स्वीट मार्टचे मालक पवन शरद लाटकर वय – 26 वर्षे, रा. यादोगोपाळ पेठ सातारा, चंदु मिठाईवाले बॉम्बे स्वीट्सचे चंद्रहास जाधव रा. भवानी पेठ, मोतीचौक सातारा आणि श्रीराम पुजा भांडारचे श्रीराम नामदेवराव कोटगिरे वय -35 वर्षे, सोमवार पेठ सातारा यांनी आपापली दुकाने सुरू ठेवल्याचे आढळून आले. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोज प्रतिबंधक कायद्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!