पोक्सो अंतर्गत आरोपीस ३ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । सातारा । अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा शाबित झाल्याने आरोपी अमोल हिंदुराव धायगुडे वय 23 रा शेखमिरवाडी ता खंडाळा याला पोक्सो अंतर्गत तीन वर्ष शिक्षा सुनाविण्यात आली . जिल्हा सत्र न्यायाधीश एस के पटणी यांनी हे आदेश बुधवारी दिले .

आरोपीस तीन वर्ष सक्तमजुरी तीन हजार रुपये दंड व तो न दिल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली गेली . या खटल्याची माहिती अशी आरोपी धायगुडे याने 1 डिसेंबर 2021 रोजी सकाळी आठ वाजता तामखडा नावाच्या शिवारात माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत विनयभंग केला . पीडित मुलगी घरी घाबरून गेली असता तो तिच्या घराचा दरवाजा वाजवत राहिला . दिनांक 2 डिसेंबर रोजी आरोपीने अल्पवयीन मुलीच्या समक्ष लज्जास्पद वर्तन केले . पीडितेच्या फिर्यादी नुसार शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या प्रकरणाचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरिक्षक एस व्ही पाटील यांनी केला . पोलीस निरीक्षक नवनाथ मदने , सपोनि सतीश पवार यांनी या प्रकरणी विशेष सहकार्य करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले . अॅड नितीन मुके यांनी सरकार च्या वतीने खटल्याचे काम पाहिले . या प्रकरणी तीन साक्षीदार तपासण्यात आले . परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदारांच्या साक्षी च्या आधारे जिल्हा सत्र न्यायाधीश एस के पटणी यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा 12 नुसार आरोपीस तीन वर्ष सक्तमजुरी , तीन हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.


Back to top button
Don`t copy text!