बलात्काराप्रकरणी आरोपीस 20 वर्षे सक्तमजूरी, 5 हजार दंडाची शिक्षा 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.२: घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रक रणी आरोपीस न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरी तसेच 5 हजार रुपये दंडाची शिक्षा  सुनावली आहे. नंदन बापू अडागळे वय 46 असे आरोपीचे नाव असून जादा सह  जिल्हा न्यायाधीश श्री. पटणी यांच्यासमोर ही सुनावणी झाली.

याबाबत माहिती अशी, दि. 24 जून 2018 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास  आरोपी नंदन बापू अडागळे याने घरामध्ये येवून अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करू न बलात्कार केला. याबाबत पीडितने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली  होती. याप्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक श्री.  व्ही. एस. चव्हाण व महिला पोलीस उपनिरीक्षक ए. बी. दयाळ यांनी नमुद  गुन्हयाचा उत्कृष्ठ तपास करुन आरोपीविरुध्द सबळ पुरावा प्राप्त करुन मुदतीत  न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते.

या खटल्याची सुनावणी श्री. पटणी जादा सह जिल्हा न्यायाधीश, सातारा यांचे  न्यायालयामध्ये झाली असून दि. 01 फेब्रुवारी 2021 रोजी न्यायालयाने आरोपी  नंदन बापू अडागळे वय 46 वर्षे यास 20 वर्षे सक्त मजूरी, 5 हजार दंड, दंड न  भरल्यास 6 महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.

नमुद खटल्याच्या सुनावणीमध्ये सरकारी अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. एन. डी. मुके, अ ॅड. ए. एस. घारगे यांनी काम पाहिले आहे. त्यांना पैरवी अधिकारी म. पो. ना.  शुंभागी भोसले यांनी मदत केली. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अप्पर  पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक व्ही.  एस. चव्हाण व महिला पोलीस उपनिरीक्षक ए. बी. दयाळ, पैरवी अधिकारी  म.पो.ना.शुंभागी भोसले तसेच तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!