दैनिक स्थैर्य | दि. १९ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथील आरोपी बिलाल रफिक कुरेशी, रा. कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण याच्यावर तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बिलाल रफिक कुरेशी यास सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका व पुरंदर तालुका, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका येथून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी रात्री फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस रात्रगस्तीवर आरोपी बिलाल रफिक कुरेशी हा जिंतीनाका येथील तेज पेट्रोलपंप येथे मिळून आला. त्यास सातारा जिल्हा हद्दीत येण्याकरीता मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय फलटण यांची परवानगी घेतली आहे काय असे विचारले असता त्याने परवानगी घेतली नसल्याबाबत सांगितले.