आरोपीला पळून जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यास अटक


दैनिक स्थैर्य । दि.०१ एप्रिल २०२२ । लोणंद । लोणंद पोलीस स्टेशनच्या कमानी जवळ असणाऱ्या हॉटेल अन्वी समोर बुधवारी सांयकाळी लोणंद पोलीस आळजापुर, ता. फलटण येथील समीर गुलाब इनामदार यास ताब्यात घेत असताना त्या आरोपीच्या अटकेस विरोध करुन आरोपीला पळून जाण्यासाठी प्रयत्न केल्याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये अमीर गुलाब इनामदार रा. आळजापुर, ता. फलटण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन याप्रकरणी लोणंद पोलीसानी अमीर इनामदार यास अटक केले आहे. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

याबाबत लोणंद पोलीस स्टेशनमधुन मिळालेली अधिक माहिती अशी की, लोणंद पोलीस स्टेशन समोर असणाऱ्या कमानीनजीकच्या हॉटेल अन्वी समोर लोणंद पोलीस आळजापुर, ता. फलटण येथील समीर गुलाब इनामदार यास ताब्यात घेत असताना आरोपीचा भाऊ अमीर इनामदार याने त्या आरोपीच्या अटकेस विरोध करुन आरोपीच्या सुटकेसाठी बेकायदेशीररित्या प्रयत्न केल्याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये अमीर गुलाब इनामदार रा. आळजापुर ता फलटण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणी लोणंद पोलीसानी अमीर गुलाब इनामदार यास अटक केली आहे. या घटनेची फिर्याद सहाय्यक पोलीस फौजदार अंकुश नामदेव इवरे यांनी दिली असुन या घटनेचा अधिक तपास सुळ हे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!