लेखा व कोषागार दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा; निवृत्तीवेतनधारकांच्या सूविधा केंद्राचे अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.१: सातारा कोषागार निवृत्तधारकांना व इतर शासकीय कार्यालयांना अद्यावत व तात्काळ सेवा देत असल्याने कोषागारातील कर्मचारी अधिकारी सन्मानास पात्र आहेत, कोषागार दिनानिमित्त विशेष गुणवत्ताधारक कर्मचाऱ्यांचा सन्मान करुन सातारा कोषागाराने वेगळा ठसा निर्माण केला आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केले.

सातारा जिल्हा कोषागारात कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी 1 फेब्रुवारी हा लेखा व कोषागार दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे, जिल्हा शल्यचिकीत्सक सुभाष चव्हाण, जिल्हा कोषागार अधिकारी धनाजीराव शिंदे, स्थानिक लेखा निधीचे सहायक संचालक शार्दुल पाटील, सातारा नगरपरिषदेच्या मुख्य लेखाधिकारी आरती नांगरे पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी निवृत्ती वेतनधारकांसाठी तयार करण्यात आलेल्या सूविधा केंद्राचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कोषागार दिनानिमीत्त सर्व उपस्थितांना कोषागार दिनाच्या शुभेच्छाही अपर जिल्हाधिकारी श्री.शिंदे यांनी दिल्या. रक्तदान शिबीराचा जिल्हा शल्यचिकीस्तक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेची व पाककला स्पर्धेची मान्यवरांनी पाहणी केली.

कोषागाराकडून नेहमीच नावीण्यपूर्ण योजना राबविल्या जातात, असे सांगून जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे यांनी कोषागार दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

नाविन्यपूर्ण योजनेतून “शीघ्र प्रतिसाद कोषागारे”(Quick Response Treasury अर्थात QRT) संगणकीय प्रणाली कोषागार कार्यालयात आस्थापित करून जलद व अचूक लोकाभिमुख सेवा देण्याचा मनोदय जिल्हा कोषागार अधिकारी धनाजीराव शिंदे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला.

यावेळी कामकाजात विशेष गुणवत्ता दाखवलेल्या मेढा उपकोषागार अधिकारी मंदार जोशी, कनिष्ठ लेखापाल विशाल बन्ने, लेखालिपीक जयकुमार अहिवळे, पांडूरंग भोसले, साईराम कुलकर्णी, सीमा जगदाळे शितल लांडगे, प्रविण कुलकर्णी अमोल परिट विश्रांती पाटील, स्वप्नील जगदाळे, नाईक सुभद्रा वायदंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

कारोनाविषाणूच्या आपत्पकालीन परिस्थीतीत विशेष काम केलेल्या साताऱ्यातील उपकोषागार अधिकारी कौशल्या लिगाडे, वासंती जांभळे, कोरेगावचे विनोद मोरे, उपलेखापाल मनिषा ननावरे, अनिता मदने, लेखालिपीक भाग्यश्री हेंद्र यांचा कोविड योध्दा म्हणून प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वित्त व लेखा सेवेत वर्ग 1 च्या पदावर निवड झालेल्या स्थानिक निधी लेखा कार्यालयाच्या स्नेहल सांवत, व वर्ग 2 च्या लेखाधिकारी पदावर निवड झालेल्या प्रविण पाटील यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोद यादव यांनी केले तर आभार जयकुमार अहिवळे यांनी मानले. कार्यक्रमास अपर कोषागार अधिकारी योगेश करंजेकर, किशोर सपकाळ, सुहास पवार, सहायक लेखाधिकारी शितल बोबडे यांच्यासह कर्मचारी वृंद उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!