
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक: दि.२ : पिंपोडे बुद्रुक येथील लेंभे वस्ती परिसरात गोठ्याला आग लागून चार जनावरे ठार झाली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पिंपोडे बुद्रुक ता कोरेगाव येथील आनंद लेभें( वय ३८) यांच्या काटा नावाच्या शिवारात असलेल्या गोठ्याला शुक्रवारी दरम्यान अचानक आग लागली यामध्ये गोठ्यातील तीन मोठ्या गाई व एक म्हैस असे चार जनावरे मृत्यूमुखी पडली. त्यासोबतच शेतीचे साहित्य, पशुखाद्य असे एकून २,१६,५५० रूपयांचे नुकसान झाले. अचानक लागलेल्या आगीची माहिती मिळताच पिंपोडे बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच नैनेश कांबळे, वाठार स्टेशन पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पाटील व कर्मचारी, महसूल प्रशासनाचे अधिकारी, युवक व ग्रामस्थ या ठिकाणी दाखल झाले दरम्यान घटनेची नोंद वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात नोंद केली असून पुढील तपास पोलिस धुमाळ करत आहेत.