
दैनिक स्थैर्य । दि. २४ सप्टेंबर २०२१ । कराड । वाठार ता. कराड हद्दीत गुजरातवरून आलेल्या पोलिसांच्या वाहनास अपघात झाला. कोल्हापूरकडे निघालेली पोलीस वाहन दुभाजकावर आदळले. त्यानंतर रस्त्याकडेच्या झाडावर पोलीस व्हॅन धडकली. या अपघातात सहा गुजरात पोलीस जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात पोलिसांची पोलीस व्हॅन कोल्हापूर बाजुकडे निघाली होती. कोल्हापूर येथे निघालेली व्हॅन कराड तालुक्याच्या हद्दीत वाठार येथे आल्यावर पोलीस वाहन समोरून निघालेल्या ट्रकला थोडीशी धडकली. धडकेने पोलीस वाहनाच्या चालकाचा ताबा सुटून वाहन पलटी झाली. कालेटेकचे महेश जाधव, विठ्ठल जाधव यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी अपघातग्रस्त पोलीस गाडीतील जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले.