स्थैर्य, दि. १४: रेणापूर – पिंपळफाट्याजवळ अंबाजोगाई-लातूर या बसचा व उभ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघातात झाला. शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या अपघातामध्ये नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमधील तिघे अत्यावस्थ आहेत.
अंबाजोगाई येथून लातूरकडे निघालेल्या लातूर डेपोच्या बसने (एमएच 20, बीएल 1053) रेणापूर-पिंपळफाटाजवळ विटाने भरलेल्या उभ्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक बसली. या भीषण अपघातात बसची एक बाजू कापली जाऊन बसमधील नऊ प्रवाशी गंखीर जखमी झाले आहे. यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.
अपघातातील जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. अपघात एवढा भीषण होता की बसची एक बाजू कापली गेली असून बसचालक केबीनमध्ये अडकला होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.