हलगर्जी मृत्यूप्रकरणी गुन्हा


स्थैर्य, भुईंज, दि.०५: भरधाव वेगाने गाडी चालवल्याने अपघात होवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, दि. 26 फेब्रुवारीला आकाश अशोक भोसले रा. शिरगाव, ता. वाई आणि विश्‍वजीत रुद्राक्ष साळुंखे रा. भुईंज हे कंपनीतील शिफ्ट संपल्यानंतर दुचाकीने (एमएच 11 वाय 9602) भुईंजला जात होते. यावेळी विश्‍वजीत रुद्राक्ष साळुंखे हे दुचाकी चालवत होते. सुरूर, ता. वाई येथे महामार्गावर रात्री दीडच्या सुमारास खडीवरून त्यांची दुचाकी घसरली व रस्ता दुभाजकाला धडकली. दुचाकी भरधाव असल्याने दोघेही सेवारस्त्यावर फेकले गेले. या अपघातात विश्‍वजीत साळुंखे यांच्या छातीला आणि पोटाला मार लागला तर आकाश भोसले हे किरकोळ जखमी झाले. साळुंखे यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पहाटे साळुंखे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आकाश भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भरधाव गाडी चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी विश्‍वजीत साळुंखे यांच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!