दैनिक स्थैर्य | दि. १७ जून २०२३ | सातारा |
पाचगणी येथील एका शाळेमध्ये अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलावर पाचगणी पोलीस ठाण्यात अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना नोव्हेंबर २०२२ ते मार्च २०२३ यादरम्यान घडली.
पीडित मुलगा ९ वर्षांचा असून त्याच्यावर अत्याचार करणारा मुलाचे वय १२ वर्षे आहे. दोघेही ठाणे जिल्ह्यातील असून पाचगणीत शिक्षण घेत आहेत. पीडित मुलाने अत्याचाराबाबतची माहिती आईला दिल्यानंतर आईने गुन्हा दाखल केला. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए. एस. माने करत आहेत.