दैनिक स्थैर्य | दि. १७ जून २०२३ | सातारा |
सातार्यातील वाय. सी. कॉलेजसमोर शिंदेशाही चायनीज दुकानासमोर वाहतूक शाखेतील पोलिसाला अज्ञातांनी लाकडी दांडके व लोखंडी पट्टीने मारहाण केली. दि. १६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वाहतूक नियंत्रण शाखेतील हवालदार योगेश कृष्णात जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी योगेश जाधव हे अजंठा चौक येथील सिध्दकला ट्रान्स्पोर्ट समोरून दुचाकीवरून जात असताना दोन दुचाकींवरून आलेल्या चार अज्ञातांनी जाधव यांच्या दुचाकीचा पाठलाग केला. वाय. सी. कॉलेजसमोर पाठलाग करून दुचाकी थांबविली. तेव्हा ‘तू गल्लीत खूप दादागिरी करतो व तुझ्या शेजारी राहणार्या दगडू पिसाळ, नितीन पिसाळ यांना दमदाटी करतो’ असे म्हणून त्यांनी जाधव यांना लाकडी दांडक्याने व लोखंडी पट्टीने मारहाण केली. यात जाधव यांच्या डोक्यास दुखापत झाली आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार भवारी अधिक तपास करत आहेत.