अबू आझमी ‘इन्कम टॅक्स’च्या रडारवर; देशभरात २०हून अधिक ठिकाणी छापेमारी


दैनिक स्थैर्य । दि. १५ नोव्हेम्बर २०२२ । मुंबई । समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांच्यावर आता इन्कम टॅक्स विभागानं मोर्चा वळवला आहे. आझमी यांच्याशी संबंधित सुमारे २० हून अधिक ठिकाणांवर विभागानं छापेमारी केली आहे. बेनामी संपत्ती आणि काळ्या पैशासंबंधी ही कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि लखनऊ यांसह इतरही ठिकाणांवर ही छापेमारी झाली आहे.

कुलाब्यातील कमल मेंशन या इमारतीत इन्कम टॅक्स विभागानं छापेमारी केली आहे. या ठिकाणी अभा गुप्ता आणि अबू आझमी यांचं कार्यालय आहे. तर वाराणसीत विनायक निर्माण लिमिटेड कंपनीच्या परिसरात छापेमारी झाली. आरोप करण्यात आला आहे की, अभा गुप्ताद्वारे कंपनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली आहे. याशिवाय विनायक रिअल इस्टेट ग्रुप देखील इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आहे. इन्कम टॅक्स विभागानं हवाला ऑपरेटर्सकडे छापेमारी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!