मलठण येथील फरार आरोपी जेरबंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २३ सप्टेंबर २०२३ | फलटण |
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी फरार असलेला आरोपी इगतपुरी (नाशिक) येथून जेरबंद करण्यात आला आहे. या प्रकरणी त्याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

याबाबत अधिक माहिती अशी, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नं. १४२७/ २३ कलम ३६३ प्रमाणे दि. १४ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल होता. यातील आरोपी अजय संजय जाधव (वय २३, रा. स्वामी समर्थ मंदिर, मलठण) याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. तेव्हापासून हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता.

अखेर पोलिसांनी सदर आरोपीस इगतपुरी, नाशिक या ठिकाणी ताब्यात घेतले व पीडित अल्पवयीन मुलीची सुटका करून सदर गुन्ह्याला कलम ३७६ व बालकांच्या लैंगिक अपराध कलम ४ प्रमाणे कलम वाढ करून सदर आरोपीला अटक केलेली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक हुलगे हे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर व पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)


Back to top button
Don`t copy text!