अभिनव जंगम याने शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविले उज्वल यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 01 ऑगस्ट 2023 | फलटण | मराठा विद्या प्रसारक समाज संस्था, फलटण संचलित कै. मल्हारराव सस्ते विद्यालय, सस्तेवाडी, फलटण येथील विद्यार्थी अभिनव सतीश जंगम याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत ११६ वा आणि तालुका गुणवत्ता यादीत ९ वा क्रमांक पटकावला असून या यशाबद्दल त्याचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत रजत आणि मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत ए ग्रेड प्राप्त करुन त्यामध्येही उज्वल यश त्याने संपादन केले आहे. गुणवत्ता वाढीसाठी अभिनवला त्याचे शिक्षक बजरंग गायकवाड, विश्वास घनवट, सुनील केंजळे, विठ्ठल पवार, कवडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथील वरिष्ठ प्राध्यापक सतीश जंगम आणि अबॅकस क्षेत्रातील शिक्षिका सौ. पद्मजा जंगम यांचा सुपुत्र असलेल्या अभिनव जंगम याने आतापर्यंत सतत उच्च शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त केली असून विविध क्षेत्रातील अभ्यासात सतत मग्न असणारा अभिनव जंगम एक वेगळा विद्यार्थी आहे.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, सचिव समशेरसिंह नाईक निंबाळकर, संचालक राजेंद्र नागटिळे, मुख्याध्यापक सुनील सूर्यवंशी, प्राचार्य रणदेव खराडे, मुख्याध्यापक अजित गायकवाड, मुख्याध्यापक शिवाजीराव पवार, प्रा. रविंद्र कोकरे, कमला निमकर बालभवनचे मुख्याध्यापक जगदाळे, सौ. कुमुदिनी स्वामी आणि सौ. सुशीला जंगम, सदाशिव स्वामी व शिवाजी जंगम, प्रा. मिलिंद स्वामी, महेश जंगम यांनी अभिनवचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!