दैनिक स्थैर्य | दि. २४ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त ५ जानेवारीला ‘आपली फलटण मॅरॅथॉन’चे आयोजन केले आहे. स्पर्धेचे हे ७ वे वर्ष आहे. दरवर्षी लोकांचा उत्साह वाढतच आहे.
लोकांना व्यायामाची सवय लागावी, सगळ्यांचे आरोग्य उत्तम राहावे, या शुद्ध हेतूनेच आपण ही मॅरेथॉन सुरू केली आहे. दरवर्षी एका मोठ्या मान्यवराला बोलावून त्यांचे सर्वांना मागदर्शन आणि त्यांच्या हस्ते मॅरेथॉनची बक्षीस वाटप असा उपक्रम घेत असतो.आत्तापर्यंत डॉ. शरद हर्डीकर, स्वर्गीय सिंधुताई सपकाळ, आयपीएस विश्वासराव नांगरे पाटील, खासदार अमोल कोल्हे, डॉ. प्रकाश बाबा आमटे, सौ. मंदाकिनी आमटे, कीर्तनकार चारुदत्त आफळे, आयपीएस कृष्ण प्रकाश या सर्व लोकांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे.
यावर्षी स्पर्धेवेळी नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, बिग बॉस फेम आणि सेलिब्रिटी महेश मांजरेकर श्रोत्यांना संबोधित करण्यासाठी आणि विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यासाठी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६ वाजता सजाई गार्डन येथून सुरू होणार्या ‘आपली फलटण मॅरॅथॉन २०२४-२५’चा ‘फ्लॅग ऑफ’ ते इतर मान्यवरांच्या हस्ते करणार आहेत. एकूण ३ वयोगटामध्ये पुरुष व महिला असे प्रत्येकी पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते दिली जाणार आहेत.
पहिले बक्षीस :- १०,०००
दुसरे बक्षीस :- ७,०००
तिसरे बक्षीस:- ५,०००
अशी सर्व मिळून १८ बक्षिसे दिली जाणार आहेत.
मॅरॅथॉन पूर्ण करणार्यांना आकर्षक फिनिशर मेडल दिले जाणार आहे. तसेच भाग घेणार्या रनर्सना प्रत्येकी एक मॅरॅथॉन किट दिले जाणार आहे.
नोंदणी करण्यासाठी
www.joshihospitalpvtltd.com
या वेबसाईट ला जरूर भेट द्या.
नोंदणी शुल्क ७५०/- फक्त.
नोंदणीची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२४ ही आहे, अशी माहिती आपली फलटण मॅरेथॉन संघ, फलटण रोबोटिक्स सेंटर, जोशी हॉस्पिटल प्रा. लि. फलटण यांनी केले आहे.