आमिरची अनोखी शपथ : ‘लालसिंग चड्ढा’ रिलीज होईपर्यंत मोबाईल फोन बंद ठेवणार आमिर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.१: आमिर खानने मोबाईल डिटॉक्सिंगचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच तो आता त्याचा मोबाईल फोन बंद ठेवणार आहे. ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटच्या प्रदर्शनापर्यंत आमिरने त्याचा मोबाईल बंद ठेवण्याचा अनोखा निर्णय घेतला आहे. तो सध्या राजस्थानमध्ये असून त्याचा जवळचा मित्र अमीन हाजीच्या ‘कोई जाने ना’ या चित्रपटातील गाण्याच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त्याने या चित्रपटातील स्पेशल अपिअरन्ससाठी आपल्या आगामी लालसिंग चड्ढा या चित्रपटाच्या शूटिंगला ब्रेक लावला आहे. परंतु यावेळी त्याने मोबाईल फोन बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिजिटल युगात आपण दर पंधरा मिनिटांनी आपला मोबाईल चेक करत असतो. मोबाईलशिवाय आयुष्याची कल्पना करणेही अवघड आहे. ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाच्या कामात व्यग्र असतात मोबाईलमुळे कोणताही त्रास होऊ नये म्हणून आमिरने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.

सोशल मीडिया टीम करणार हँडल

आमिरने नो फोन पॉलिसी सेटसह आपल्या वैयक्तिक जीवनातही लागू केली आहे. सोमवारपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याने कुटुंबासह आणि इतर जवळच्या लोकांना आवश्यक कामासाठी त्याच्या मॅनेजरशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. जेणेकरून कामात अडथळा येणार नाही. इतकेच नाही तर आमिरचे सोशल मीडिया अकाउंट्सही लालसिंग चड्ढाच्या रिलीजपर्यंत त्याची टीम सांभाळणार आहे.

ख्रिसमसला रिलीज होणार लालसिंग चड्ढा
आमिर खान लवकरच मुंबईला परतणार असून लालसिंग चड्ढाच्या शूटिंगला सुरुवात करेल. कोरोनामुळे वर्षभरापासून ठप्प पडलेल्या बॉक्स ऑफिसला रुळावर आणण्यासाठी केवळ चाहतेच नव्हे तर थिएटर मालकही लालसिंगच्या रिलीजची प्रतीक्षा करत असल्याची कल्पना आमिरला आहे.

लालसिंग चड्ढाच्या दिग्दर्शनाची धुरा अद्वैत चंदन यांच्यावर आहे. लवकरच चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शन सुरुवात होणार आहे. हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसला रिलीज होऊ शकतो. या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग आमिरसह महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!