आमिर खानचा ‘लगान’ आणि सत्यजीत रे यांच्या ‘अपूर संसार’चा जगातील बेस्ट मुव्ही एडिंगमध्ये समावेश, वल्चरने बनवली टॉप 101 चित्रपटांची लिस्ट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि. २४: तीन भारतीय चित्रपटांना वल्चरने बनवलेल्या बेस्ट मुव्ही एंडिंगच्या यादीत स्थान मिळाले आहे. हा निश्चितच भारतीय सिनेमासाठी अभिमानाचा क्षण आहे. या यादीत सामील झालेल्या आमिर खानच्या ‘लगान’ आणि सत्यजीत रे यांच्या ‘अपूर संसार’ या चित्रपटांचा शेवट सर्वोत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. याशिवाय मीरा नायर यांच्या ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटाचाही शेवट सर्वोेत्कृष्ट ठरला आहे. खरं तर ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटाला यादीत स्थान मिळालेले नाही, मात्र याचा उल्लेख 15 अशा चित्रपटांमध्ये केला गेला, ज्यांचा शेवट सर्वोत्कृष्ट राहिला, मात्र त्यांना यादीत स्थान मिळवता आले नाही.

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लगान’ला या यादीत 90 वे स्थान देण्यात आले आहे. तर सत्यजित रे यांच्या 1951 च्या ‘अपूर संसार’ या चित्रपटाला 41 वा क्रमांक मिळाला. ही यादी तयार करणा-या टीमने प्रत्येकाला स्थान मिळावे म्हणून प्रत्येक दिग्दर्शकाचा चित्रपट पाहिला. यादी जारी करताना वल्चरने लिहिले – या चित्रपटांची खासियत काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही चित्रपटाचा शेवट पाहिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चित्रपटाचे शीर्षक त्याच्या शेवटासोबत जुळणे आवश्यक होते. त्यानेच वल्चरच्या टीमला चित्रपटाशी कनेक्ट केले. वल्चरने आपल्या वेबसाइटवर या सर्व 101 चित्रपटांचे एंडिग सीनदेखील शेअर केले आहेत.

जागतिक सिनेमामध्ये अपु ट्रिलॉजीचा मोठा वाटा

अपूर संसार हा चित्रपट सत्यजीत रे यांच्या वतीने वर्ल्ड सिनेमाला दिलेले सर्वात मोठे योगदान आहे. एक वडील जो आपल्या मुलाची काळजी घेऊ शकत नाही कारण मुलाच्या जन्माच्या वेळीच त्याच्या पत्नीचा मृत्यू होतो. ती ब-याच वर्षांनी त्याला भेटायला येते. वेदना, दुःख आणि थेट अंतःकरणास स्पर्श करणारा अंत आहे. त्यामुळे या यादीमध्ये स्थान मिळविण्यात हा चित्रपट यशस्वी झाला. महत्त्वाचे म्हणजे वल्चर ही यूएस बेस्ड एंटरटेन्मेंट वेबसाइट आहे.


Back to top button
Don`t copy text!