दैनिक स्थैर्य । दि. १५ नोव्हेम्बर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील मोठे असलेल्या विडणी ग्रामपंचायतिचा बिगुल वाजला आहे. यावेळी फलटण तालुक्यामध्ये प्रथमच आम आदमी पार्टी स्वबळावर विडणी ग्रामपंचायत निवडणुक लढवणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे युवा आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील लोखंडे व फलटण तालुकाध्यक्ष वीरसेन सोनवणे यांनी दिली.
विडणी ग्रामपंचायतीच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय आम आदमी पार्टीच्या वतीने घेण्यात आला आहे. थेट सरपंचपदा साठी आम् आदमी पक्षाचे फलटण तालुका उपाध्यक्ष अनिकेत किसन नाळे हे निवडणूक लढवणार आहेत. तसेच ग्रामपंचायतीचे भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभार यावर वेळी वेळी घेतले भूमिका या मुळे आम आदमी पक्षा बद्दल ग्रामस्थांना मध्ये असलेली चर्चा व आम आदमी पक्षाकडून लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा या मुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय लोकांच्या आम आदमी पक्ष एक नवीन पर्याय ग्रामस्थांना पुढे उभा राहील आहे. इच्छुकांची संख्या वाढली असून लवकरच उमेदवार यादी तयार करून जाहीर केली जाईल, असेही आम आदमी पक्षाचे युवा आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील लोखंडे व फलटण तालुकाध्यक्ष वीरसेन सोनवणे यांनी स्पष्ट केले.
यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या काम करण्याची शैली व शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात केलेली कामगिरी यामुळे आम आदमी पक्षा बद्दल तरुणांमध्ये वाढत असलेला विश्वास या मुळे तरुणाची पहिली पसंती आपला मिळत असल्याचे अधोरखित केले. त्या मुळे आम् आदमी पक्षाच्या वतीने सुशिक्षित, सुसंस्कृत, समजसेवेची आवड असलेले, गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ज्या तरुण कडे ब्ल्यू प्रिंट व योजना असतील अशा सर्व तरुण वर्ग याना प्रधान्य दिले जाणार आहे. लवकरच आम् आदमी पक्षाचे जाहीरनामा म्हणजे आश्वासन नाही तर कामांची गॅरंटी जाहीर केल्या जातील, असेही आम आदमी पक्षाचे युवा आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील लोखंडे व फलटण तालुकाध्यक्ष वीरसेन सोनवणे यांनी स्पष्ट केले.