आधार कार्ड अपडेट करण्याची मोठी संधी; ३१ डिसेंबरपर्यंत मोफत करता येणार ‘हे’ काम

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरणने (UIDAI) नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, मोबाईल ॲपच्या माध्यमातून आधार कार्डमधील ईमेल आयडी अपडेट करण्याची सुविधा ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २० ऑक्टोबर : आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र बनले असून, प्रत्येक शासकीय कामासाठी आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारमधील माहिती अचूक असणे गरजेचे आहे. नागरिकांना घरबसल्या आपल्या कॉन्टैक्ट डिटेल्स अपडेट करता याव्यात, यासाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. याआधी आधारमध्ये ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी ७५ रुपये शुल्क द्यावे लागत होते, मात्र आता ही सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.

घरबसल्या कशी कराल प्रक्रिया?

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आधार सेवा केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही. युझर्स त्यांच्या स्मार्टफोनवर अधिकृत आधार ॲप डाऊनलोड करून या प्रक्रियेचा लाभ घेऊ शकतात. ॲपमध्ये लॉगिन करून ‘अपडेट ईमेल’ किंवा ‘अपडेट आधार डिटेल्स’ या पर्यायावर क्लिक करून नवा ईमेल आयडी टाकता येतो. सर्व पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर घरबसल्या ही माहिती विनामूल्य अपडेट होते.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!