
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा

स्थैर्य, कोरेगाव, दि. 20 : सोनके, ता. कोरेगाव येथील युवक करोना तून बरा झाला असून नुकतेच त्याला रूग्नालयातून सोडण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला गावातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
संबंधित करोना मुक्त झालेला युवक कराड येथे कामानिमित्त काही दिवस वास्तव्यास होता. 2 मे रोजी त्याचा करोना अहवाल सकारात्मक आल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्यावर सातारा शासकीय रूग्नालयात उपचार करण्यात आले. यशस्वी उपचारानंतर तो युवक कोरोनामुक्त झाला. दरम्यान, आज सातारा रूग्नालयातून डिस्चार्ज दिलेल्या 7 रुग्णांमध्ये त्याचा सामावेश असून त्याला सोनके येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.


