दैनिक स्थैर्य | दि. १८ एप्रिल २०२३ | फलटण |
बरड (ता. फलटण) येथील एका ५५ वर्षांच्या महिलेवर तिच्या घरात घुसून दि. १२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी २.०० वाजेच्या सुमारास संतोष महादेव चव्हाण (राहणार बुधनवरवाडी, ता. फलटण) याने बलात्कार केल्याची फिर्याद पीडित महिलेने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
या घटनेची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, बरड (ता. फलटण) येथे दि. १२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी २.०० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला तिच्या घरी एकटी असताना तिच्या गावाशेजारी राहणारा संतोष महादेव चव्हाण (राहणार बुधनवरवाडी, ता. फलटण) याने अचानक फिर्यादीच्या घरी पाठीमागून येऊन घराची कडी आतून लावून फिर्यादीचे तोंड दाबून तिला घरातील बेडवर झोपून तिचे इच्छेविरुद्ध जबरदस्ती केली व तिच्याशी शारीरिक संबंध केले आहेत. यावेळी आरोपीने घरातील कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली म्हणून फिर्यादीने आजपर्यंत भीतीपोटी तिच्या पतीस ही घटना सांगितली नव्हती. त्यानंतर १७ एप्रिल रोजी पतीशी चर्चा करून पीडित महिलेने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष महादेव चव्हाण (राहणार बुधनवरवाडी, ता. फलटण) यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सपोनि भोसले करत आहेत.