सातारा नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम संपूर्ण घरपट्टी भरलेल्या सातारकरांना मोफत राष्ट्रध्वज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०६ ऑगस्ट २०२२ । सातारा । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सातारा नगरपरिषदेमार्फत ज्या मिळकतधारकांनी  दि. 1 एप्रिल 2022 पासून आपली संपूर्ण घरपट्टी भरलेली आहे त्यांना मोफत तिरंगा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सातारा नगरपरिषदेचे  अतिरिक्त मुख्याधिकारी पराग  कोडगुले यांनी दिली.

ज्या नागरिकांनी दि. 1 एप्रिल 2022 पासून आपली घरपट्टी भरलेली आहे त्यांनी सातारा नगरपरिषद सातारा मुख्य कार्यालय, नगरपरिषद कार्यालय सदरबझार,  नगरपरिषद कार्यालय गोडोली, नगरपरिषद कार्यालय शाहुपुरी, नगरपरिषद कार्यालय विलासपूर येथून आपली घरपट्टी भरलेली पावती सोबत घेवून येवून राष्ट्रध्वज घेऊन जावेत व ज्यांना राष्ट्रध्वज विकत घेण्याची इच्छा आहे त्यांनी वरील ठिकाणी रु. 25/-  भरुन  राष्ट्रध्वज विकत घ्यावेत व येणाऱ्या 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये राष्ट्रध्वज आपल्या मिळकतींवर फडकवावेत.

तरी नागरिकांनी लवकरात लवकर मिळकतकर भरुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही श्री. कोडगुले यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!