दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑक्टोबर २०२२ । सातारा । चोरीच्या मोटारसायकली बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भगवान निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली सातारा गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस स्टाफ माहिती घेत असताना एक सराईत मोटारसायकल चोरटयाकडे एक विना नंबर प्लेटची मोटारसायकल असल्याबाबत खास बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाल्यावर सदर चोरटयास पोलीसांनी ताब्यात घेतले. सदरचा चोरटा काही दिवसापूर्वीच मोटारसायकल चोरीचे गुन्हयामध्ये जेलमधून सुटलेला असून त्याचे नाव प्रल्हाद शिवाजी पवार रा. अजंठा चौक सातारा असे आहे. त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याचेकडे तीन मोटारसायकली मिळून आलेल्या असून त्यापैकी दोन मोटारसायकली सातारा शहरातून चोरी केले असल्याचे तपासामध्ये दिसून आलेले आहे. अन्य एका मोटारसायकल कोठून चोरी केली याबाबत तपास सुरू आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक साो, अजयकुमार बन्सल, मा अपर पोलीस अधिक्षक सो. अजय बो-हाडे, मा. श्री. मोहन शिंदे पोलीस उपअधिक्षक, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भगवान निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पो.ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, गणेश भोंग, सागर गायकवाड, गणेश घाडगे, संतोष कचरे, विशाल धुमाळ, गणेश घाडगे यांनी केलेली आहे.