स्थैर्य, फलटण, दि. 7 : वडले, ता. फलटण येथील पाॅसिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेला मौजे वडले येथील १ व्यक्तीचा करोनाचा अहवाल पाॅसिटीव्ह आलेला आहे, त्या मुळे फलटण तालुक्यात एका नवीन करोना रुग्णाची भर पडली असून तालुक्यात करोनाचे 28 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. वडले, बरड व सस्तेवाडी येथील ११ व्यक्तींचे अहवाल निर्विवाद आल्याने त्यांचे स्वॅब पुन्हा पाठवण्यात येणार आहेत. त्या सोबतच वडले, बरड, फलटण येथील करोना रुग्णाच्या हाय रिस्क संपर्कातील 21 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली. आज अखेर करोना बाधित असलेले एकूण 28 रुग्ण फलटण तालुक्यात आहेत. त्या सोबत तालुक्यात ह्या पूर्वी एकूण ९ रुग्ण करोना पासून बरे झाले असून तालुक्यात ४ जणांचा करोना मुळे मृत्यू झाला असल्याची माहिती फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.
काल (दि. 06 जून) अखेर एकूण फलटण तालुक्यात 2704 व्यक्ती होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती असून त्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. फलटण येथे असणाऱ्या करोना केअर सेंटर मधील कन्फर्म वार्ड मध्ये एकूण २ रुग्ण असून सस्पेक्ट वार्ड मध्ये ६८ व्यक्ती आहेत. सस्पेक्ट वार्ड मध्ये वडले, बरड, होळ व खामगाव येथील हाय रिस्क कॉन्टॅक्टचा समावेश असून काल एकूण करोनाच्या २० जणांच्या चाचण्या घेतल्या असून काल अखेर ५३ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.