
दैनिक स्थैर्य । दि. ०३ डिसेंबर २०२२ । सातारा । मंगळवार पेठेतील एका घरातून सुमारे एक लाख तीस हजाराची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 27 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शिवदिन जनार्दन कुलकर्णी वय 77, रा. मंगळवार पेठ, सातारा यांच्या घरात प्रवेश करून कुलकर्णी यांच्या उशीशेजारी ठेवलेले 1 लाख 25 हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि 4 हजार रुपये किंमतीचा मोबाईल अशी, 1 लाख 29 हजार रुपयांची चोरी केली आहे. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक फौजदार जगदाळे अधिक तपास करीत आहेत.