
दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२३ | फलटण |
निंबळक (ता. फलटण) गावच्या हद्दीत दि. ३१ ऑगस्टच्या रात्री सव्वाबारा वाजता गोवंश जातीच्या गाई कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या घेऊन जात असताना पकडण्यात आल्या. या छाप्यात गोवंशीय खिल्लार जातीच्या दोन देशी गाई व एक जर्शी गाय दाटीवाटीने भरून चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कत्तल करण्यासाठी वाहतूक करीत असताना मिळून आल्या.
या प्रकरणी टेम्पोचालक युवराज शंकर खलाटे (वय ४३, रा. खुंटे, ता. फलटण) व वसीम कुरेशी (रा. कुरेशीनगर, ता. फलटण) याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी गाईंसह टेम्पो (क्र. एम.एच.११टी ७९८५) पोलिसांनी जप्त केला आहे. अधिक तपास पो. ह. साबळे करत आहेत.