घडशी समाजाचे निवेदन भाजपाला सादर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ जुलै २०२३ | फलटण |
घडशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिष्टमंडळामार्फत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले. यावेळी समाजाच्या सर्व विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघाचे अध्यक्ष अनिल पवार, सचिव शरद धुमाळ (बारामती), धोंडिराम साळुंखे (सदस्य), अभिजीत पवार (कोषाध्यक्ष), सातारा जिल्हाध्यक्ष सुनील पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक नंदकुमार गायकवाड (गुंळुचे), नाना जगताप (शिवरी), यश जगताप, घनश्याम मोरे (जेजुरी), माजी जिल्हाध्यक्ष पुणे प्रसाद मोरे (जेजुरी), गुरूदास साळुंखे, मुंबई घडशी समाज संघाचे संस्थापक सेक्रेटरी व भाजपाचे सचिव नवनाथ पडळकर यांचे नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे यांनी घडशी समाजाच्या विकासासाठी शासन दरबारी ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असल्याची ग्वाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.
या निवेदनात घडशी समाजाच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!