दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑक्टोबर २०२३ | बारामती |
सध्याच्या अत्याधुनिक काळात समोरच्याकडून प्रत्येकाच्या अपेक्षा जास्त आहेत व कमी श्रमात जास्त पैसा पाहिजे. जर कमी पैसा किंवा कमी वाटणी मिळाल्यास नवीन वाद सख्ख्या भावात व भावकित सुरूवात होते. अन्याय झालेला न्याय मागण्यासाठी कधी नातेवाईक तर कधी कोर्टात जातो, तर कधी रक्तपात होतो; परंतु जरी अन्याय झाला तरी त्यास काही मंडळी सहन करतात व आध्यात्मिक मार्गातून आनंद साधतात.
इंदापूर तालुक्यातील डाळज येथील शिंदे कुटुंबात सदर घटना घडली. घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणजेच वडील असेपर्यंत एकत्र राहणारे मोठे कुटुंब व प्रतिष्ठित कुटुंब होते. वडिलांच्या निधनानंतर हळूहळू जमीन वाटणीची सुरूवात होऊ लागली. अशा वेळेस ज्या व्यक्तीने जमीन घेण्यासाठी जास्त कष्ट व धन खर्च केला, त्याच व्यक्तीस समान वाटणीतील सर्वात कमी हिस्सा जाणीवपूर्वक देण्यात आला.
मिळालेल्या वाटणीतील शेतीकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही तसेच राहण्यासाठी घरामध्ये हिस्सा देण्यात आला नाही, अशावेळी एखादी व्यक्ती रागास जाईल, भांडणे करील, कोर्टकचेर्या करेल, मानसिक खचून जाईल; परंतु भगवंताचा आशिर्वाद समजून मिळाले त्यात सुख समजून शांत राहिली. कोणतेही चुकीचे पाऊल न टाकता देवदर्शन व तीर्थस्थान भेट करते व भागवत ग्रंथ खरेदी करून गणेश आगमनादिवशी भागवत ग्रंथाचे वाचन सुरू करून १० दिवसात १३१२ पाने, १८००० श्लोक, ३४० अध्याय पूर्ण वाचन करून रितसर पूजन करून अध्याय समाप्ती करते.
‘जगा व जगू द्या’ या उक्तीप्रमाणे शांत राहून आपली दिनक्रम सुरू करून पुन्हा पडिक शेताचे पूजन करून नवीन कामाचा शुभारंभ करते. नवीन पिढीस संदेश देतात… ‘नशिबातील कोणी नेणार नाही, निसर्गावर विश्वास ठेवा, कोणत्याही क्षेत्रात योग्यवेळी न्याय मिळणारच’.
अशी व्यक्ती समाजात आज सापडणे कठीणच; परंतु शिंदे कुटुंबातील या व्यक्तीने आज ‘जगावे कसे’ याचा आदर्श आपल्यापुढे ठेवला आहे. त्यांना आज जरी कुटुंबातील जमिनीचा त्यांच्या हकाचा हिस्सा मिळाला नसला किंवा दिला नसला, तरी ते आज मनाने खूप श्रीमंत झाले आहेत व आयुष्यभर राहणार आहेत, हे नकी!