
दैनिक स्थैर्य | दि. 08 एप्रिल 2023 | मुंबई | महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ‘स्थैर्य’च्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेष अंकाचे प्रकाशन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
प्रारंभी ‘स्थैर्य’चे संपादक प्रसन्न रुद्रभटे यांनी श्रीमंत रामराजे यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देवून विशेषअंकाच्या निर्मितीविषयी थोडक्यात माहिती दिली. यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी संपूर्ण अंकाचे अवलोकन करुन ‘स्थैर्य’च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.