सामाजिक बांधिलकीची भावना महत्वाची : ह.भ.प. जौंजाळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, निमसोड, दि. १४: सार्वजनिक जीवनात काम करताना सामाजिक बांधिलकीची भावना महत्वाची असते. असे ह.भ.प.जयवंत जौंजाळ यांनी व्यक्त केले.

निमसोड (ता. खटाव) येथे बाबासाहेब देशमुख वि.का.स. सेवा सोसायटीचे सचिव धनाजीराव देशमुख यांचे दिवंगत सुपुत्र विजय देशमुख यांच्या स्मरणार्थ शालेय साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते.

जौंजाळ म्हणाले की, मनुष्याच्या जीवनात अनेक चढउतार येत असतात. वाईट प्रसंगात खचून न जाता अश्या प्रसंगांना धैर्याने तोंड देणे गरजेचे असते. तरुण मुलाच्या जाण्याचे दु:ख त्याच्या कुटुंबियांनाच माहित असते. असले मोठे दु:ख विसरुन देशमुख कुटुंबिय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने दिवंगत मुलाच्या स्मृती चिरंतन जतन करुन ठेवत आहेत. भजन, किर्तनाबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, अन्नदान करणे, हे विधायक उपक्रम अतिशय स्तुत्य आहेत. अश्या विधायकतेचा समाजाने आदर्श घेण्याची गरज आहे.

दरम्यान कळे (ता.कोल्हापूर) येथे आयोजित क्रिकेट सामन्यातील विजेत्या व उपविजेत्या संघास स्व.विजय देशमुख यांच्या स्मरणार्थ चषक देण्यात आले.

यावेळी अभिजीत देशमुख,सरपंच महेंद्र देशमुख, चेअरमन भीमराव घाडगे,प्रतापराव माने, सिध्दनाथ देशमुख, चंद्रकांत देशमुख, महादेव देशमुख, अजय देशमुख आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

अनिल भगत यांनी सुत्रसंचालन केले. रणजित देशमुख यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!