स्थैर्य, सातारा दि. 30 : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असून 31 जुलै 2020 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी खालीलप्रमाणे जारी केले आहेत.
ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडतो त्या ठिकाणी कंटेन्मेंट झेन जाहिर करण्याचे अधिकार इन्सिडंट कमांडर म्हणून संबंधित उपविभगीय अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. संबंधित कंटेन्मेंट झोन बाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेश काढून त्या झोनमध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वांना सूचित करतील. हा आदेश कंटेन्मेंट झोन वगळता सातारा जिल्ह्यातील इतर क्षेत्राला हे आदेश लागू राहतील. तसेच कंटेन्मेंट झोन बाबत त्या त्या क्षेत्रातील इन्सिडंट कमांडर यांचे अस्तित्वात असलेले आदेश हे संबंधित क्षेत्रात लागू राहतील. तसेच कंटेन्मेंट झेन इनॲक्टीव्ह झल्यानंतर या क्षेत्रात हे आदेश लागू राहतील. तसेच भविष्यामध्ये जर सातारा जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी संबंधित इन्सिडंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी हे त्या ठिकाणी नव्याने कंटेन्मेंट झोन जाहिर करुन वेगळा आदेश काढून त्या झोनमध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबती प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वांना सुचित करतील.
खालील गोष्टींना सातारा जिल्ह्यामध्ये प्रतिबंध राहील
सातारा जिल्ह्यातील सर्व व्यक्तींच्या हालचाली अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा या कारणाशिवाय रात्री 9 ते सकाळी 5 या कालावधीत प्रतिबंधीत करण्यात येत आहे. वय वर्ष 65 वरील व्यक्ती, persons with co morbidities, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता घरामध्येच रहावे. त्यांना बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील. सर्व शाळा कॉलेज, शैक्षणिक संस्थ, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंन्स्टिट्युट या बंद राहतील. तथापि, शैक्षणिक संस्थांची कार्यालये (विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा) कर्मचारी यांना शिक्षकेत्तर कामाकरीता परवनागी देण्यात येत आहे. त्यामध्ये ई सामग्रीच्या विकासासह उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन व निकालाची घोषणा याचा समावेश राहील. सर्व चित्रपट गृहे, जिम, व्यायमशाळा, सर्व मॉल व बाजारपेठ संकुल, स्विमींग पुल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील. तथापि, सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत लग्नाशी संबधित मेळावे, समारंभ संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असल्यास किंवा Standard Operating Procedure नुसार चालू राहील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मानेरंजन शैक्षणिक, सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील. सर्व धर्मीक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. शॅापिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आणि हॉस्पिटॅलीटी सर्व्हिसेस बंद राहतील. तथापि, सातारा जिल्ह्यातील रेस्टॉरंट यांना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडील 18 मे रोजीच्या आदेशातील अटी व शर्तीनुसार खद्यपदार्थांची होम डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी असेल.
खाली बाबी जिल्ह्यामध्ये चालु राहतील
वर प्रतिबंधीत केलेल्या (शासनाकडील दि. 31 मे च्या आदेशातील क्लॉज क्र. 8 ) सर्व बाबी सोडून आणि whichare not explicitly prohibited or banned या सोडून इतर सर्व दुकाने, शॉप, औद्योगिक व खाजगी आस्थापना चालु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. प्रतिबंधित नसलेल्या कृती करण्यास कोणत्याही परवानगीची गरज नाही. क्रीडांगण, स्टेडियम व इतर सार्वजनिक खुल्या जागेमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय व समुह विरहीत सामाजिक अंतर ठेवून शारीरिक व्यायाम व इतर क्रिया करण्यास परवानगी देण्यात येत आहे. Indoor stadium किंवा Indoor portion मध्ये कोणत्याही गोष्टीस परवानगी नाही. सर्व वैयक्तीक व सार्वजनिक वाहतुकीस पुढीलप्रमाणे परवानगी राहील. दोन चाकी (फक्त चालक), तीन चाकी व चार चाकी (1+2 व्यक्ती). सुरक्षित शारिरीक अंतर व सफाई व्यवस्थेची खबरदारी घेऊन , विहीत केलेल्या प्रावासी क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने जिल्ह्यांतर्गत बस सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये चालु राहतील. जर गर्दी अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद करावीत.
व्यक्ती व वस्तुंच्या हालचालीबाबत विशेष सुचना
सर्व प्राधिकारी यांनी मेडिकल प्रोफेशनल्स, नर्सेस आणि पॅरा मेडिकल स्टाफ, सॅनिटायझेशन पर्सनल आणि ॲम्ब्युलन्स यांना कोणत्याही प्रतिबंधाशिवाय राज्याअंतर्गत व राज्या बाहेर प्रवास करण्यास मान्यता द्यावी. अंतर राज्य अंतर जिल्हा व्यक्तीच्या वाहतुकीस निर्बंध राहतील.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शासकीय कार्यालयात आरोग्य सेतू या ॲपचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच हे ॲप व त्यावरील माहिती प्रत्येकाने वेळोवेळी अद्ययावत करणे बंधनकारक राहील.
राष्ट्रीय व राज्य पातळीवर खालीलप्रमाणे कोरोना प्रतिबंध अपाययोजन करणे सर्वांसाठी बंधनकार राहील
मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 500/- रं. दंड आकारावा. सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेहऱ्याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 500/- रु. दंड आकारावा. सातारा जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक अथवा खाजगी जागेच्या ठिकाणी थुकण्यास मनाई असून, थुंकल्यास 1000/- रु. दंडा आकारावा. जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधमानध्ये समसाजिक अंतरपाळणे बंधनकारक आहे. कोणत्याही करणासाठी मोठ्या सेख्येने लोकांनी एकत्र येणे यावर प्रतिबंध राहील. लग्नाशी संबंधित मेळाव्यांमध्ये 50 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करण्यास परवानगी राहील. सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधितक्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलीत मंगलकार्यालय, हॉल, सभगृह, घर व घराच्या परसरात 50 लोकांच्या मर्यादेत लग्नाशी संबंधित मेळावे, समारंभ पवानगीबाबत शासनाकडी दि. 23 जूनचे पत्र व जिल्हाधिकारी यांच्या दि. 26 जूनच्या आदेशान्वये कार्यवाही करावी. तथापि, लोकांनी गर्दी होऊ नये म्हणून संयोजकांनी काळजी घेणे गरजेचे राहील. अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 50 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करण्यास परवानगी राहील. सार्वजनिक ठिकाणी दारु, पानर, तंबाखु इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात येत आहे. दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 500/- दंड आकरावा दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंड आकारावा तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात यावे. वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी देण्याता येत आहे (घरपोच वितरणासह). केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे शासनाने दिलेलया अटी व शर्ती तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडील दि. 27 जून मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्र व महा ई सेवा केंद्रे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण यांच्याकडील दि. 11 जून मधील आदेशानुसार अटी व शर्तीन्वये चालू ठेवण्यास परवानगी राहील. सातारा जिल्ह्यातील इंधन पंप रात्री 9 ते पहाटे 5 या कालावधीतही चालु ठेवण्यास परवानगी आहे. तथापि, रात्री मालवाहतूकीची वाहने यांना इंधनपुरवठा करणे बंधनकारक राहील. शासनाने किंवा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांनी अन्य कोणत्याही विशिष्ट, सामान्य आदेशाद्वारे परवानगी देण्यात आलेली कृती करण्यास परवानगी राहील.
या आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंड, दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 2000/- दंड आकारावा व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात यावे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी.
शक्य असेल त्या ठिकाणी घरातून काम करण्यास प्राधान्य द्यावे. कामाच्या आणि व्यवसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, थर्मल स्कॅनिंग, हँडवॉश, सॅनिटायझर, याची एंन्ट्री पाँईंट व एक्झिट पॉईंट वर व्यवस्था करावी. कामाच्याठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात यावे. सर्व औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलण्याचे वेळी, जेवणाच्या व इतर सुट्टीच्या वेळी, कामावर येतांना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाठणे बंधनकारक आहे.
कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला या आदेशात कोणत्याही प्रकारचा बदल करुन किंवा नवीन आदेश पारीत करुन या आदेशाच्या विसंगत कोणताही आदेश, जिल्हाधिकारी सातारा यांच्या पूर्व परवानगीशिवाय पारीत करता येणार नाही.